Loading

President's Message

President's Message

Straight from the heart...

थेट अंतःकरणापासून

एकच प्याला!

हात आहे तर पाय नाही, पाय आहे तर हात नाही. कित्येकांना जागचं हलतासुद्धा येत नाही. कान असून ऐकता येत नाही. डोळे आहेत, तर दृष्टी नाही. मतिमंदांना तर मन आणि मेंदू असला तरी त्यात वैचारिक प्रगल्भता नाही. अशा अवस्थेत यांचं मन थाऱ्यावर कसं राहणार ? नैसर्गिकपणे ज्यांचं मन थाऱ्यावर नसतं त्यांचं सर्वच वाऱ्यावर जाण्याची शक्यता असते. मग सुजान, सूज्ञ समाजाने यांना वाऱ्यावर सोडायचं?

मुळात माणूस सुखात जगण्यासाठी तनाने, मनाने व धनाने समर्थ असावा लागतो. यांच्याकडे यातील विशेष असं काहीच नाही. समोर आहे फक्त दुःख. दुःखाचा काठोकाठ भरलेला प्याला. जीवनामध्ये भावनांचे रंगी बेरंगी असंख्य प्यालेच रिचविले जातात, पण ह्यांच्या प्याल्यातील एक घोटही पचविला जात नाही. हे त्यांचं दुर्दैवातील दुर्दैव!

गाडी, बंगला व ऐश्वर्य यांची कधीही, कुणाकडेही, काहीही मागणी नसलेला हा जगातील एकमेव घटक असावा. यांना कसल्याही संपत्तीची श्रीमंतीची तसेच कुणाकडूनही सर्वस्व दानाची अजिबात गरज नाही.

खरी गरज आहे ती फक्त वैयक्तिक व सामाजिक योगदानाची ! अपंग व्यक्तीप्रती जिव्हाळा ठे वणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ते मानवतावादी व राष्ट्रीय कार्य असुन भारतीय संस्कृतीचे भूषण आहे.

शब्दांकनः
श्री. प्रतापराव वामनराव खांडेभराड
संस्थापक अध्यक्ष, पी के फाउंडेशन